सामान्य माणसाला ज्या दैनंदिन नागरी समस्यांना सामोरं जावं लागत आहे त्या केंद्रस्थानी ठेवून आम्ही पुण्यातील काही वकिलांनी, उच्च शिक्षित व कष्टकरी नागरिकांनी लोकसंघर्ष पक्षाची स्थापना केली. तरुणांनी, शिक्षितानी, कष्टकरी, कार्यक्षम लोकांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावं या उद्देशाने कामं चालू केल. सुरुवातीला आमची थट्टा झाली पण वेळोवेळी आम्ही घेत असलेल्या भूमिका, कार्यपद्धती सामान्य लोकांना आवडू लागली. सद्याच्या अत्यंत प्रतिकूल राजकीय, सामाजिक परिस्थितीही आम्ही परखडपणे, निर्भीडपणे, बेधडक पद्धतीने नागरी समस्यांना वाचा फोडत आहोत, लिहीत आहोत, बोलत आहोत. आमचं हे निर्भीड आणि परखड काम सामान्य माणसांच्या काळजाला हात घालत आहे हे पाहून खूप बरं वाटतं. त्यामुळे आमच्या या बेधडक, परखड आणि निर्भीडपणाला मत देऊन साद घालायची की नाही हे आता तुम्हा माय बाप जनतेने ठरवायचे आहे.
आम्हांला मतदान करुन आमचं बळ वाढवायचे की नाही हे ही तुम्हीच ठरवायचे आहे. तुम्ही आमच्या पदरात मतं टाकली तर तुमच्या समोर एक आदर्श राज्यव्यवस्था शिवछत्रपतीच्या प्रेरणेने आम्ही नक्की उभी करू शकतो हा आम्हांला ठाम विश्वास आहे. कायद्याचे अभ्यासक असल्याने हे ढिम्म प्रशासन कसं हालवायचे हे आम्हाला चांगल समजतं. त्यामुळं शेवटी तुम्ही ठरवायचं आहे की आमच्या सारख्या सक्षम पर्यायाला मतरूपी आशीर्वाद देऊन संधी द्यायची की नाही.
प्रश्न राहिला की आज देशात अनेक दिग्गज आहेत, अनेक पर्याय आहेत मग आम्ही तुम्हाला मतं का द्यायचं? तर एक लक्षात घ्या की आज आपल्या देशाला सक्षम पर्यायची नितांत गरज आहे. ही गरज आपण ओळखली पाहिजे आणि त्यासाठी योग्य पावलं उचलली पाहिजेत आणि आपल पुणे हे एक असं शहर आहे जिथे नेहमी क्रांतीला सुरुवात झाली आहे. जे पुण्यात सुरु होत ते नंतर देशभर पसरत.
मग स्वराज्याचा पहिला सोन्याचा नांगर असूदेत किंवा विदेशी कपड्यांची पहिली होळी असुदेत. म्हणूनच महाराष्ट्राचे पहिले मुख्य न्यायाधीश, माजी राज्यपाल, विधिज्ञ् श्री.एम.सी छागला त्यांच्या रोजेस इन डिसेंबर या पुस्तकात नमूद करतात की, "What Poona Thinks Today, India Will Think Tommorrow". त्यामुळे आपण देशात सक्षम पर्याय निर्माण करण्याची एक चळवळ हाती घेत आहोत असं समजून मतदान करा. तुम्ही जागरूक राहून आम्हाला मतदान केल तर आमची ताकद वाढेलच पण आजच्या प्रस्थापितानाही झक मारत तुमच्या दारात यावं लागेल इतकी ताकद तुमच्या एका मतात आहे. गरज आहे फक्त ती ताकद ओळखुन योग्य दिशेने ती वापरण्याची!
शेवटी एकच आवाहन करतो की, प्रचलित राजकीय व्याभिचाराला फाट्यावर मारण्याची वेळ आता आली आहे. "या देशाचं काही होऊ शकत नाही" या मानसिकतेतुन तुम्हा मतदाराना बाहेर पडावं लागेल. देशासमोर अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी सक्षम पर्याय निर्माण करणं ही तुमची आमची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न सुरु केले आहेत. एक सक्षम पर्याय आम्ही यंदाच्या पुणे लोकसभा निवडणुकीत दिला आहे. लोकसंघर्ष पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार अ.क्र.28 वरील ॲड.योगेश दिनकर माकणे यांच्या 🔦बॅटरी टॉर्च🔦 या चिन्हा समोरील बटणं दाबून प्रचंड बहुमताने विजयी करुन एक सक्षम पर्याय निर्माण करण्यासाठी हातभार आपण लावावा ही कळकळीची विनंती करत आहोत! आम्हाला मत देऊन एका नव्या क्रांतीला बळ देणं हे सर्वस्वी आता तुमच्या हातात आहे.
वेबसाईट - www.loksangharsha.com,
फेसबुक - लोकसंघर्ष
युटयुब - loksangharsh207
- ॲड. शिवम पोतदार
संघटक- लोकसंघर्ष पक्ष