लेख

इलेक्टोरल बॉण्ड बद्दल माहिती

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर electoral bond बद्दल माहिती SBI ने दिली आहे. त्यातून कोणत्या पक्षाला किती पैसे मिळाले हे समजते. सर्वाधिक पैसे मिळालेल्या प्रथम पाच पक्ष पुढीलप्रमाणे आहेत, 1) भाजपा 6061 Cr, 2) तृणमुल काँग्रेस 1610 Cr, 3) काँग्रेस 1422 Cr, 4) भारत राष्ट्र समिती 1215 Cr, 5) बिजू जनता दल 716 Cr. राजकीय प्रचारासाठी कंपनीकडून पैसे घेणे चूक नाही परंतु ज्या लोकांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. ज्यांच्यावर ED, CBI यांची कार्यवाही चालू आहे अशा लोकांच्या कंपन्याकडून जर हे लोक पैसे घेत असतील तर त्याबदल्यात त्यांच्यावरची कारवाई शिथिल तर केली जात नसेल ना? किंवा त्यांना आणखी काही फेवर तर दिला जात नसेल ना? असा प्रश्न पडतो. हे धक्कादायक यासाठी आहे कारण blood money law ची सुरुवात आहे जे पाकिस्तानच्या कोर्टात सहजपने चालत. Blood Money Law चे उदा- एका मुलीचा रेप करुन निर्घृण खून करण्यात आला. मुलीच्या वडिलांनी केस दाखल केली. आरोपीला अटक झाली. खटला चालू झाला आणि आता गुन्हेगाराला शिक्षा करायच सोडून कोर्ट मुलीच्या वडिलांना विचारू लागलं की “तुमची मुलगी तर गेली, तिच्यासोबत जे झालं ते वाईटच झालं, आमची सहानुभूती आहे पण आता का ती परत येणारे? आरोपी चिक्कार पैसे द्यायला तयार आहे तुम्ही ते घ्या आणि गप बसा! ह्याला blood money law म्हणतात. या इलेक्टोरल बॉण्डच्या माध्यमातून हेच चालू झालंय. वाटेल तसले धंदे करायचे. सामान्य माणसांकडून पैसे गोळा करायचे आणि हे bond खरेदि करुन सगळ्या पापांवर अंथरून टाकून घायच. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामूळे आता कोणी कोणत्या पक्षाला पैसे दिले हे पण स्पष्ट होईल. मग जर गुन्हेगारांकडून पैसे घेऊन जे पक्ष चालवत आहेत त्यांना मतदान करायचं की नाही हे सामान्य लोक ठरवतील.
 
ॲड. शिवम पोतदार
संघटक- लोकसंघर्ष पक्ष

आम्हाला मतदान का करावे?

सामान्य माणसाला ज्या दैनंदिन नागरी समस्यांना सामोरं जावं लागत आहे त्या केंद्रस्थानी ठेवून आम्ही पुण्यातील काही वकिलांनी, उच्च शिक्षित व कष्टकरी नागरिकांनी लोकसंघर्ष पक्षाची स्थापना केली. तरुणांनी, शिक्षितानी, कष्टकरी, कार्यक्षम लोकांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावं या उद्देशाने कामं चालू केल. सुरुवातीला आमची थट्टा झाली पण वेळोवेळी आम्ही घेत असलेल्या भूमिका, कार्यपद्धती सामान्य लोकांना आवडू लागली. सद्याच्या अत्यंत प्रतिकूल राजकीय, सामाजिक परिस्थितीही आम्ही परखडपणे, निर्भीडपणे, बेधडक पद्धतीने नागरी समस्यांना वाचा फोडत आहोत, लिहीत आहोत, बोलत आहोत. आमचं हे निर्भीड आणि परखड काम सामान्य माणसांच्या काळजाला हात घालत आहे हे पाहून खूप बरं वाटतं. त्यामुळे आमच्या या बेधडक, परखड आणि निर्भीडपणाला मत देऊन साद घालायची की नाही हे आता तुम्हा माय बाप जनतेने ठरवायचे आहे. आम्हांला मतदान करुन आमचं बळ वाढवायचे की नाही हे ही तुम्हीच ठरवायचे आहे. तुम्ही आमच्या पदरात मतं टाकली तर तुमच्या समोर एक आदर्श राज्यव्यवस्था शिवछत्रपतीच्या प्रेरणेने आम्ही नक्की उभी करू शकतो हा आम्हांला ठाम विश्वास आहे. कायद्याचे अभ्यासक असल्याने हे ढिम्म प्रशासन कसं हालवायचे हे आम्हाला चांगल समजतं. त्यामुळं शेवटी तुम्ही ठरवायचं आहे की आमच्या सारख्या सक्षम पर्यायाला मतरूपी आशीर्वाद देऊन संधी द्यायची की नाही.
 
प्रश्न राहिला की आज देशात अनेक दिग्गज आहेत, अनेक पर्याय आहेत मग आम्ही तुम्हाला मतं का द्यायचं? तर एक लक्षात घ्या की आज आपल्या देशाला सक्षम पर्यायची नितांत गरज आहे. ही गरज आपण ओळखली पाहिजे आणि त्यासाठी योग्य पावलं उचलली पाहिजेत आणि आपल पुणे हे एक असं शहर आहे जिथे नेहमी क्रांतीला सुरुवात झाली आहे. जे पुण्यात सुरु होत ते नंतर देशभर पसरत. मग स्वराज्याचा पहिला सोन्याचा नांगर असूदेत किंवा विदेशी कपड्यांची पहिली होळी असुदेत. म्हणूनच महाराष्ट्राचे पहिले मुख्य न्यायाधीश, माजी राज्यपाल, विधिज्ञ् श्री.एम.सी छागला त्यांच्या रोजेस इन डिसेंबर या पुस्तकात नमूद करतात की, “What Poona Thinks Today, India Will Think Tommorrow”. त्यामुळे आपण देशात सक्षम पर्याय निर्माण करण्याची एक चळवळ हाती घेत आहोत असं समजून मतदान करा. तुम्ही जागरूक राहून आम्हाला मतदान केल तर आमची ताकद वाढेलच पण आजच्या प्रस्थापितानाही झक मारत तुमच्या दारात यावं लागेल इतकी ताकद तुमच्या एका मतात आहे. गरज आहे फक्त ती ताकद ओळखुन योग्य दिशेने ती वापरण्याची!
 
शेवटी एकच आवाहन करतो की, प्रचलित राजकीय व्याभिचाराला फाट्यावर मारण्याची वेळ आता आली आहे. “या देशाचं काही होऊ शकत नाही” या मानसिकतेतुन तुम्हा मतदाराना बाहेर पडावं लागेल. देशासमोर अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी सक्षम पर्याय निर्माण करणं ही तुमची आमची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न सुरु केले आहेत. एक सक्षम पर्याय आम्ही यंदाच्या पुणे लोकसभा निवडणुकीत दिला आहे. लोकसंघर्ष पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार अ.क्र.28 वरील ॲड.योगेश दिनकर माकणे यांच्या 🔦बॅटरी टॉर्च🔦 या चिन्हा समोरील बटणं दाबून प्रचंड बहुमताने विजयी करुन एक सक्षम पर्याय निर्माण करण्यासाठी हातभार आपण लावावा ही कळकळीची विनंती करत आहोत! आम्हाला मत देऊन एका नव्या क्रांतीला बळ देणं हे सर्वस्वी आता तुमच्या हातात आहे.
 
ॲड. शिवम पोतदार
संघटक- लोकसंघर्ष पक्ष

वाहन विक्री बंद

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर आणि आय.टी हब म्हणून ओळख असलेल्या आपल्या पुणे शहराचा भूभाग साधारणपणे ५१६.१८ चौ. किमी इतका विस्तारलेला असून सद्यस्थितीत आपल्या पुण्याची साधारणत: ४,४३६,००० इतकी लोकसंख्या आहे. मोठ्या प्रमाणात असलेल्या अनियंत्रित लोकसंख्येमुळे आपल्या पुण्यात अनेक समस्यांना आपण सध्या सामोरे जात आहोत. त्यातील एक आणि आपल्या सर्वांना दिसून येत असलेली समस्या म्हणजे वाढती वाहन संख्या आणि ट्रॅफिक! हि समस्या फक्त आपल्याकडेच आहे अस नाही तर जगातील अनेक शहरांमध्ये देखील हि समस्या दिसून येते. बाहेरच्या अनेक शहरांनी, तेथील स्थानिक लोकांनी एकत्रित येऊन त्यावर उपाय शोधले आणि सर्वांनी ते स्वीकारल्याने हि समस्या नाहीशी होत गेली. मग आपल्याकडे अस का नाही होउ शकत? नक्कीच होऊ शकते! असा मला ठाम विश्वास आहे. कारण आपल पुणे अस शहर आहे जिथे क्रांतीची पहिली ठिणगी पडते आणि नंतर ती देशभर पसरते. त्यामुळे वाढती वाहन संख्या आणि ट्रॅफिक सारख्या नागरी समस्येबाबत देखील आपण नक्कीच एकत्रित येऊन हि समस्या हद्दपार करू शकू अस मला नेहमी वाटत. “या देशाच काही होऊ शकत नाही!, आपल बाहेर जाऊन राहिलेलं बर!” हि असली व्याक्य ऐकण्यासाठी माझ्यासारखे तरूण तयार नाहीत.
 
तर आपली हि ट्रॅफिकची आणि वाढत्या वाहनांची नागरी समस्या समूळपणे नष्ट करण्यासाठी आपल्याला थोडा शास्त्रशुद्ध अभ्यास करून या समस्येच्या मुळाशी जाऊन काम करावे लागेल. या ट्रॅफिकच्या समस्येमधील विविध मुद्दे गांभीर्याने समजून घ्यावे लागतील. ट्रॅफिकची समस्या मोठी होण्यामागे अनेक कारणं आहेत ज्यामध्ये अपुरे सिग्नल, अपुरे वाहतूक पोलीस, अरुंद रस्ते, बेकायदेशीर पार्किंग, अनियोजित विकास, लेन न पाळणे, अपघात, ट्रॅफिक ओवरलोड, बांधकाम, चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडणारे नागरिक, रस्त्यात वाहन थांबवून ठेवणारी जनता, खराब रस्ते, चुकीची कनेक्टीव्हिटी, अयोग्य ड्रायविंग सवयी आणि या सर्वात प्रकर्षाने आपल्या सर्वाना जाणवते ते कारण म्हणजे ‘वाढती वाहनांची संख्या आणि त्यावर शासनाचे नसलेले नियंत्रण. त्यामुळे या वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय स्तरावर नक्की काय परिस्थती आहे. त्याचे काय दुष्परिणाम आहेत आणि त्यावर काय उपाययोजना असतील याचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.
 
अॅमस्टरडॅम येथील ‘टॉम टॉम ट्रॅफिक इंडेक्स २०२३’ या सर्वेक्षणानुसार वाढती वाहन संख्या आणि शहरी वाहतूक समस्या हि आपल्या पर्यावरणावर आणि आपल्या प्रवासाच्या कार्यक्षमतेवर मोठा दुष्परिणाम करत असते. हे थोडक्यात समजून घेण्यासाठी या सर्वेक्षणातील धक्कादायक माहिती आपल्याला उपयुक्त ठरते. यातील माहितीनुसार असे कळते कि सध्या वाहतूक समस्येमुळे सर्वाधिक संथ गतीने वाहतूक कि लंडन शहरात आहे जिथे १० किमी चे अंतर गाडीतून पार करण्यासाठी ३७ मिनिटे लागतात. अशा प्रकारची संथ वाहतूक असलेल्या प्रथम दहा शहरांमध्ये ६ व्या स्थानावर भारतातील बेंगलोर शहर असून तिथे १० किमी चे अंतर पार करण्यासाठी २८ मिनिटे लागतात आणि ७ व्या स्थानावर आपल पुणे शहर असून इथे १० किमी अंतर पार करण्यासाठी वाहतुकीमुळे २७ मिनिटे लागतात. हि माहिती आपल्यासाठी अत्यंत धक्कादायक असून आतातरी आपण वाढत्या वाहन संख्येवर आणि वाहतूक समस्येवर गांभीर्याने विचार केला पाहिजे.
 
आता आपल्या पुण्यापुरता विचार केला तर आपल्या पुण्याची लोकसंख्या साधारण ४,४३६,००० इतकी असून आपल्या शहरात वाहनांची संख्या ४४,००,००० लाखाच्या पुढे गेली आहे. आपल्या पुण्यात लोकसंख्येपेक्षा जास्त वाहनांची संख्या आहे. सन २०२३ मध्ये तर ३ लाखाच्या वर वाहने आपल्या पुण्यात खरेदी केली गेली. तर दिवसाला ७०० च्या वर वाहने पुण्यात खरेदी केली जातात अशी माहिती मिळते. वाहनांच्या या वाढत्या संख्येमुळे जे भयंकर ट्रॅफिक आपल्या शहरात चौकाचौकात आपल्याला दिसते त्याचे पर्यावरणावर आणि आपल्या आरोग्यावर देखील घातक परिणाम होत आहेत. ‘वर्ल्ड एअर क्वालिटी इंडेक्स’ नुसार पुण्यातली हवा युनायटेड नेशन्सने ठरवून दिलेल्या मर्यादेच्या ७.९ पट इतक्या जास्त प्रमाणात प्रदूषित झाली आहे. ज्यामुळे संवेदनशील लोकांसाठी पुण्याची हवा घातक झाली आहे.
 
संवेदनशील वर्गात येणाऱ्या लोकांनी बाहेर जाऊन व्यायाम करणे अपेक्षित नाही अशी परिस्थिती असून त्यांनी मास्क वापरणे अनिवार्य झाले आहे. तसेच एअर फिल्टर वापरणे देखील आवश्यक झाले आहे. तसेच या इंडेक्स नुसार सन २०२४ मध्ये हवेच्या प्रदुषणामुळे पुण्यात साधारणत: १७०० च्या आसपास लोकांचा मृत्यू ओढवला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे ध्वनी प्रदुषणाची पातळी देखील वाढत असून पुण्यात मागील दोन वर्षात सलग १०० डेसिबल च्या वर सरासरी ध्वनी प्रदूषण मोजले गेले आहे. वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या गोंगाटामुळे अनेकांना डोकेदुखी, सर्दी, ताप, कणकण हि तर नित्याची झाली आहे. किती मोठ्या प्रमाणात कार्बन आपण आपल्या फुफ्फुसात रोज घेतोय ह्याची तर कोणीच गणना करू शकत नाही अस वाटत. हे सगळे भयंकर परिणाम पाहून आपल्याकडे काही बदल होऊ शकणार नाही आणि आता सगळ अवघड झालंय अस अनेकांना वाटणे हे स्वाभाविक आहे.
 
ज्यांना हि वाहतूक समस्या मानवनिर्मित आहे अस वाटत त्यातले काहीजण आपल्या देशाच काही होउ शकत नाही असा सूर आवळून देश सोडून बाहेर जातात आणि परदेशाच कौतुक इकडे सांगत बसतात. पण या अशा तरूण पिढीचा भाग मला होऊ वाटत नाही. त्याला काही कारणे आहेत. एकतर हा देश माझा आहे आणि “या देशाच काही होउ शकत नाही!” हे ऐकण्यासाठी मी इथे जन्म घेतलेला नाही. तसेच बाहेर परदेशात हल्ली भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आपल्या मुलांना तिथे फार कठीण काळाला सामोरे जावे लागत असून त्यापेक्षा सुरक्षित वातावरण नक्कीच माझ्या देशात मला जाणवते. त्यामुळे आपली हि वाहनांची वाढत चाललेली संख्या आणि त्यातून वाढत चाललेली वाहतुकीची समस्या हि आपणच निस्तरली पाहिजे अस मला वाटत. त्यासाठी अभ्यास केला पाहिजे, समस्या शोधली पाहिजे, तिच्या मुळाशी जाऊन उपाययोजना शोधली पाहिजे, शासनाला मदत केली पाहिजे, ऐकत नसतील तर शासनाला आणि प्रशासनाला धारेवर धरल पाहिजे. आपली रोजची कामे सांभाळून तुमच्या आमच्या आजच्या आणि भविष्यातल्या पिढीसाठी, त्यांच्या सुरक्षित आणि समृद्ध आयुष्यासाठी आपण पावल उचलली पाहिजेत. हे शक्य नाही का? तर नक्कीच शक्य आहे. इतरांनी उपाययोजना शोधायला आणि त्या अंमलात आणायला सुरुवात केली आहे.
 
आपण सिंगापूरचं उदाहरण घेतलं तर ते देखील वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे त्रस्त होते. मग तेथील ‘लँड ट्रान्सपोर्ट ऑथोरीटीने तेथे ड्रायविंग लायसेन्सची संख्या मर्यादित केली त्यामुळे नवीन लायसेन्स कोणाला हवे असेल तर त्यांना वेटिंग लिस्ट वर थांबावे लागते आणि लायसेन्स नाही तर गाडी देखील खरेदी करून उपयोग नाही. अशापद्धतीने त्यांनी वाहनांच्या संख्येवर नियंत्रण राखले. बार्सलोना मध्ये “नॉन-कार मूवमेंट” मोठी गाजली आणि तिथे “winning back streets for the people” हा संदेश कृतीतून देण्यात आला. तिथे वाहतूकग्रस्त भागांचे (superblocks) रुपांतर गार्डन, प्लाझा, प्लेग्राउंड मध्ये करण्यात आले कारण बार्सलोना मध्ये वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे दरवर्षी हवेच्या प्रदुषणात वाढ होत गेल्याने साधारणत: ३५०० लोकांचे वेळेच्या आधी निधन होत होते आणि ६१% पेक्षा नागरिक ध्वनी प्रदुषणामुळे आरोग्याच्या समस्यांनी ग्रस्त झाली होती अशी माहिती उपलब्ध आहे. नॉरवे मधील ओस्लो या शहराच्या मध्यभागी खाजगी वाहनांना बंदी आहे. पार्किंग वर मोठी बंधनं घातली गेली आहेत जेणेकरून लोकं कमीत कमी कार वापरतील. मेक्सिकोमध्ये सम विषम वाहन वाहतूक हे राबवले जाते आणि महिन्यातून एक शनिवार ‘कार फ्री डे’ पाळला जातो. आपल्या दिल्लीत देखील सम विषम वाहतूक हे सूत्र अवलंबल गेल. पॅरीसमध्ये सम क्रमांक असलेल्या वाहनांवर तात्पुरती बंदी घातली गेली होती ज्यामुळे काही भागातील प्रदूषण ३०% कमी झाले. तिथे ६०% लोकांकडे वाहन नाही. चीन मध्ये चेंगडू नावाचे शहर वसवले जात आहे जिथे सर्व सेवा सुविधा १५ मिनिटात मिळणार असे नियोजन आहे. त्यामुळे तिथे खाजगी वाहन हे अत्यावश्यक यादीतून बाहेर गेले आहे. अशाप्रकारे वाहनांची संख्या कमी करण्यासाठी जगभरात प्रयत्न चालू आहेत मग आपण का मागे आहोत? आपण सुद्धा या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून आपल्या “माझ भागतय ना? मग जाउदे तिकडे बाकीच!” या सो कॉल्ड कम्फर्ट झोनमधून बाहेर पडल पाहिजे.
 
वाढत्या वाहनांची संख्या मर्यादित करण्यासाठी आणि ट्रॅफिक समस्या कमी करण्यासाठी केवळ शासनाला बोल ठेवून चालणार नाही कारण काही सवयी आपल्याला देखील एक जबाबदार नागरिक म्हणून आधी आत्मसात कराव्या लागतील. जवळच्या अंतरावर जायचे असेल तर पायी चालत जाणे, घरात जास्तीतजास्त दोनच वाहन ठेवणे, पब्लिक ट्रान्सपोर्ट चा जसे कि बस आणि मेट्रोचा वापर वाढवणे, शेअर रिक्षा किंवा कॅब चा अवलंब करणे, एकट्यासाठी चार चाकी वाहन न वापरणे इत्यादी गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आपण हे करू लागलो तर शासनाला धारेवर धरण्याचा नैतिक अधिकार आपल्याला प्राप्त होतो. मग शासन कस नाही ऐकत सामान्य लोकांच हे सर्व एकत्र होऊन आपण पाहू शकतो. प्रस्थापित ऐकत नसतील तर चांगले शिकलेले आणि कार्यक्षम लोकं आपण लॉ मेकिंग प्रोसेस मध्ये नेऊ शकतो. इतक तर नक्कीच करू शकतो ना?
 
लोकशाहीने खूप मोठी ताकद आपल्या सामान्य लोकांना दिली आहे ती म्हणजे आपण या भारताचे सामान्य नागरिक आहोत हि ट्रॅफिक आणि अशा अनेक दैनंदिन नागरी समस्यांना आपण शिकेलेले कार्यक्षम लोकं नक्कीच चांगल्या पद्धतीने समूळ नष्ट करू शकतो हा विश्वास आम्हाला आहे आणि म्हणूनच अशा अनेक दैनंदिन नागरी समस्यांना केंद्रस्थानी ठेवून शिकलेल्या चांगल्या कार्यक्षम लोकांनी या व्यवस्थेत राजकीय दृष्ट्या देखील सक्रीय झाले पाहिजे म्हणून आम्ही पुण्यातील सर्वसामान्य घरातील काही वकिलांनी आणि उच्च शिक्षित लोकांनी “लोकसंघर्ष” या राजकीय पक्षाची स्थापना काही महिन्यापूर्वी केली आहे. गुंठेवारी नियमितीकरण, ऑनलाईन जुगारास/गेम्सना बंदी, जलसंवर्धन, वाहतूक समस्या, प्रदूषण इत्यादी नागरी समस्यांना आम्ही प्राधान्य देत आहोत. ज्याकडे प्रस्थापितांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. पुण्यातल्या वाढत्या वाहन संख्येमुळे वाढत्या वाहतूक समस्येच्या अनुषंगाने पुण्यात वाहन विक्री बंद करा अशी मागणी करणारे व १००० नागरिकांची सही असलेले निवेदन देखील मुख्यमंत्री महोदयांना नुकतेच पाठविले आहे. भविष्यात त्यावर योग्य तोडगा नाही काढला तर लोकशाही मार्गाने आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू! गरज आहे ती फक्त तुमच्या सारख्या सर्व सुज्ञ लोकांनी पाठीशी उभे राहण्याची. आम्ही आमचा प्रचार या लेखाच्या माध्यमातून अजिबात करत नाही, पण कुठेतरी कोणीतरी काहीतरी चांगल करतय हि भावना जिवंत ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करत आहोत! हे आपण सुज्ञ मंडळी समजून घेताल असा विश्वास व्यक्त करून काही चूक भूल झाली असल्यास माफी मागतो आणि आपण मोठ्या मनाने सांभाळून घेताल हि अपेक्षा!
 
ॲड. शिवम पोतदार
संघटक- लोकसंघर्ष पक्ष

मतदान जागरूकपणे करा

“ना खाऊंगा ना खाने दूंगा” अस म्हणणाऱ्या मोदीजींनीच आज एका मुलाखतीत सांगितलं की Electoral Bond च्या माध्यमातून ज्या विविवादित 16 कंपन्यानी पैसे दिले त्यापैकी 37%पैसे आमच्या पक्षाने घेतले आणि 63%इतर पक्षानी! 37% तरी का घेतले? हा साधा प्रश्न आम्हाला पडतो? तुम्ही पण त्यांच्याच रांगेत जाऊन बसलात ज्यांना वैतागून आम्ही तुम्हाला मतदान केल होत. हे Electoral Bond बेकायदेशीर आहेत असं खुद्द सर्वोच्च न्यायालय म्हणत आहे आणि त्यातूनच आपल्या पक्षाने 37% घेतल्याचे सांगत आहात. खरंतर तुमच्यावर टीका करण्या इतपत आम्ही मोठे नक्कीच नाही पण वाईट वाटतं भ्रमनिरास होतो तेव्हा ते ही अशा व्यक्तीकडुना ज्यावर एकेकाळी आम्ही खूप विश्वास दाखवला होता. कायद्याचं थोडंफार कळत म्हणून जे चुकीचं वाटतं ते बोललो नाही तर कोण बोलणार? आणि आपल्या देशाचं होणार काय? असे प्रश्न पडतात म्हणून असं लिहू वाटतं. पूर्ण क्षमतेने तुमच्यामागे उभी राहिलेली सामान्य लोकं आता तुमच्यावर विश्वास कसा ठेवतील? ते एकवेळ निवडून देतीलही पण वेगळा विचार नक्कीच करतील. आजवर मिळालेलं मताधिक्य कमी निश्चितच होईल. शेवटी लोकशाही मध्ये फक्त लोकशाहीच टिकते व्यक्ती नाही हे संविधानीक सत्य कोणीही नाकारू शकत नाही.
त्यामुळं आमचं सामान्य जनतेला एकच आवाहन आहे की, मतदान जागरूकपणे करा. आज जरी सक्षम पर्याय नसला तरी तो सक्षम पर्याय लवकरात लवकर निर्माण व्हावा ह्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. शेवटी देश महत्वाचा आणि इथलं संविधान, लोकशाही या गोष्टी महत्वाच्या आहेत!
 
ॲड. शिवम पोतदार
संघटक- लोकसंघर्ष पक्ष

मोदीजींकडून मुस्लिमांना संपत्ती वाटण्याचा काँग्रेसवर आरोप!

काँग्रेसशासित कर्नाटकात मुस्लिमाना ओबीसी मधून आरक्षण द्यायचा निर्णय! मध्येच राहुल गांधीजी यांचे भरसभेत महिलांना एक लाख रुपये बँकेत देण्याचे आश्वासन!
अरे बाबांनो काय करताय हे? आम्हाला नकोय असली आश्वासन! आम्हाला फुकटच काही नको. आम्हाला काम द्या आम्ही आमचं करुन खातो. आम्हाला नोकरीची हमी द्या. आम्हाला रोजच्या प्रदूषणातुन बाहेर काढा. आम्हाला टक्केवारी पूर्ण बंद करुन दाखवा. भ्रष्ट प्रशासन सामान्य लोकांना असंख्य चकरा मारायला लावत ते बंद करुन दाखवा.
नवमतदारांना आमचं एकचं आवाहन आहे की, जागरूक राहून मतदान करा! उमेदवार बघून मतदान करा! तुम्ही ठरवून चांगले लोकांना मतदान केल तर या देशात सकारात्मक बदल घडायला वेळ लागणार नाही इतकी प्रचंड ताकद कायद्यात, आपल्या संविधानात आहे. तेवढीच ताकद तुमच्या एका मतातही आहे हे ही विसरू नका!
 
ॲड. शिवम पोतदार
संघटक- लोकसंघर्ष पक्ष

निवडणुक का जिंकावी लागेल ?

सामान्य माणसाला ज्या दैनंदिन नागरी समस्यांना सामोरं जावं लागत आहे त्या केंद्रस्थानी ठेवून आम्ही पुण्यातील काही वकिल, डॉक्टर, सीए, आर्किटेक्ट, इंजिनिअर व उच्च शिक्षित व कष्टकरी नागरिकांनी लोकसंघर्ष पक्षाची स्थापना केली. तरुणांनी, शिक्षितानी, कष्टकरी, कार्यक्षम लोकांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावं या उद्देशाने कामं चालू केल. सुरुवातीला आमची थट्टा झाली पण वेळोवेळी आम्ही घेत असलेल्या भूमिका, करत असलेलो आंदोलने कार्यपद्धती (पक्षाची वेबसाईट www.loksangharsha.com यावर पक्षाची भूमिका, उद्देश आणि आंदोलनांची माहीती आहे) सामान्य लोकांना आवडू लागली. सद्याच्या अत्यंत प्रतिकूल राजकीय, सामाजिक परिस्थितीही आम्ही परखडपणे, निर्भीडपणे, बेधडक पद्धतीने नागरी समस्यांना वाचा फोडत आहोत, लिहीत आहोत, बोलत आहोत. आमचं हे निर्भीड आणि परखड काम सामान्य माणसांच्या काळजाला हात घालत आहे हे पाहून खूप बरं वाटतं.
 
आज समजा सातत्यने दुषप्रवृत्तींना बळी पडत आहे. मोबाईल आणि समाज माध्यमांमुळे अबाल वृध्दांना अनेक आकर्षण निमार्ण झाली आणि त्यातुन समाजाचा खरा -हास सुरु झाला. समाज बदलेल तसा कायदा बदला गेला पाहिजे. निवडणुन दिलेल्या सरकाराचे आद्य कर्तव्य म्हणजे समाज सुरक्षित, रहावा सगळ्या अर्थाने, यासाठी वेळोवेळी नविन कायदे करणे किंवा असलेल्या कायद्यामध्ये दुरुस्ती करणे परंतु, गेली कित्येक वर्ष अस्तित्वात असलेली सरकारे यात अपयशी ठरली आहेत. उदा. ऑन-लाईन गेमिंग, ऑन लाईन फ्रॉड, ऑन लाईन जुगार, ऑन लाईन वेश्या व्यवसाय याबाबत कायदा करण्याबाबत अस्तित्वात असलेली सरकारे उदासीन आहेत. त्यामुळे आम्ही बोलायचे ठरवले त्यासाठी लोकसंघर्ष नावाने युट्युब चॅनल व फेसबुक पेज काढले व त्यावर आम्ही बेधडक, परखड आणि निर्भीडपणे सरकारला जाब विचारु लागले याला चांगला प्रतिसाद येऊ लागला आणि काही बाबतीत ब-यापैकी निकाल येऊ लागला त्यामुळे येणा-या काळात समाजातील नागरी तसेच सामाजिक समस्या सोडविण्यासाठी निवडणूक लढविण्याचे ठरविेले आणि म्हणुन तुम्ही आम्हांला मतं द्यावीत. 
 
आम्हांला मतदान करुन आमचं बळ वाढवावे. तुम्ही आमच्या पदरात मतं टाकली तर तुमच्या समोर एक आदर्श राज्यव्यवस्था शिवछत्रपतीच्या प्रेरणेने आम्ही नक्की उभी करू शकतो हा आम्हांला ठाम विश्वास आहे. कायद्याचे अभ्यासक असल्याने हे ढिम्म प्रशासन कसं हालवायचे हे आम्हाला चांगल समजतं. त्यामुळं शेवटी तुम्ही ठरवायचं आहे की आमच्या सारख्या सक्षम पर्यायाला मतरूपी आशीर्वाद देऊन संधी द्यायची की नाही. प्रश्न राहिला की आज देशात अनेक दिग्गज आहेत, अनेक पर्याय आहेत मग आम्ही तुम्हाला मतं का द्यायचं? तर एक लक्षात घ्या की आज आपल्या देशाला सक्षम पर्यायची नितांत गरज आहे. ही गरज आपण ओळखली पाहिजे आणि त्यासाठी योग्य पावलं उचलली पाहिजेत आणि आपल पुणे हे एक असं शहर आहे जिथे नेहमी क्रांतीला सुरुवात झाली आहे. जे पुण्यात सुरु होत ते नंतर देशभर पसरत. मग स्वराज्याचा पहिला सोन्याचा नांगर असूदेत किंवा विदेशी कपड्यांची पहिली होळी असुदेत. म्हणूनच महाराष्ट्राचे पहिले मुख्य न्यायाधीश, माजी राज्यपाल, विधिज्ञ् श्री.एम.सी छागला त्यांच्या रोजेस इन डिसेंबर या पुस्तकात नमूद करतात की, “What Poona Thinks Today, India Will Think Tommorrow”. त्यामुळे आपण देशात सक्षम पर्याय निर्माण करण्याची एक चळवळ हाती घेत आहोत असं समजून मतदान करा. 
 
तुम्ही जागरूक राहून आम्हाला मतदान केल तर आमची ताकद वाढेलच पण आजच्या प्रस्थापितानाही झक मारत तुमच्या दारात यावं लागेल इतकी ताकद तुमच्या एका मतात आहे. गरज आहे फक्त ती ताकद ओळखुन योग्य दिशेने ती वापरण्याची! शेवटी एकच आवाहन करतो की, प्रचलित राजकीय व्याभिचाराला फाट्यावर मारण्याची वेळ आता आली आहे. “या देशाचं काही होऊ शकत नाही” या मानसिकतेतुन तुम्हा मतदाराना बाहेर पडावं लागेल. देशासमोर अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी सक्षम पर्याय निर्माण करणं ही तुमची आमची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न सुरु केले आहेत. एक सक्षम पर्याय आम्ही यंदाच्या पुणे लोकसभा निवडणुकीत दिला आहे. लोकसंघर्ष पक्ष पुरस्कृत अपक्ष उमेदवार अ.क्र.28 वरील ॲड.योगेश दिनकर माकणे यांच्या 🔦 बॅटरी टॉर्च 🔦 या चिन्हा समोरील बटणं दाबून प्रचंड बहुमताने विजयी करुन एक सक्षम पर्याय निर्माण करण्यासाठी हातभार आपण लावावा ही कळकळीची विनंती करत आहोत! आम्हाला मत देऊन एका नव्या क्रांतीला बळ देणं हे सर्वस्वी आता तुमच्या हातात आहे.
 
ॲड.शिवम पोतदार
संघटक- लोकसंघर्ष पक्ष
Call Now